Global Maharashtra Breaking News

“त्या” कोसळलेल्या फुटपाथ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रमक…

बांधकाम विभागाला घेराव घालत विचारला जाब… ⚡सावंतवाडी ता.२७-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना घेराव घालून कोसळलेला फुटपाथ दुरुस्त करण्याबाबत जाब विचारला व त्यांना या फुटपादाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट रेवती राणे…

Read More

लायन्स क्लबतर्फे श्रीकृष्ण बागवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

⚡मालवण ता.२७-: लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने सर्जेकोट मिर्याबांदा शाळेचे मुख्याध्यापक व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकृष्ण बागवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मालवण येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून लायन्सचे झोन अधिकारी सागर तेली यांच्या हस्ते बागवे यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असल्याचे श्रीकृष्ण…

Read More

समजाकारणात युवकांनी सहभाग दर्शवा-श्रीनिवास गावडे

⚡वेंगुर्ला ता.२७-: विकासाची सुरुवात ही नेहमी समाजकारणाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे सध्याच्या काळात युवकांनी समाजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवावा असे आवाहन जिल्हा युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी केले.

Read More

नगरवाचनालयाच्या पुरस्कारांचे २ ऑक्टोबरला वितरण

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे जाहिर झालेल्या पुरस्कारांचे वितरण रविवार दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगरवाचनालयाच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात होणार आहे.

Read More

कणकवलीत भाजपच्या रक्तदान शिबिराच्या आम. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

⚡कणकवली ता.२७-: भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरावड्यानिमित्त कणकवली तालुका भाजप आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ आम.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाच्या येथील दुर्गा मातेच्या मंडपात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्याच्यात कणकवली, देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान…

Read More

महामार्गासह सागरी किनारा महामार्गाच्या पुर्ततेसाठी संघटितपणे प्रयत्न करावेत

गडकरी-चव्हाण यांच्याकडून मोठी अपेक्षा- मोहन केळुसकर ⚡कणकवली ता.२७-: राज्यातील कोकण वगळता अन्य भागातील बहुतांशी राष्ट्रीय महामार्ग पुर्णत्वास गेले आहे. सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींच्या जागृतेमुळेच हे शक्य झाले आहे. मात्र नियोजनानुसार सन २००० मध्ये पुर्णत्वास होण्याची अपेक्षा असणार्या या मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्गासह पश्चिम किनारी महामार्गाचे भिजत घोंगडे किमान २०२३ पर्यंत तरी पुर्ण करण्यासाठी कोकणातील सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे प्रयत्न…

Read More

दोन लाखांवरील कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे सिंधुदुर्गनगरीत उपोषण

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ओरोस ता.२७-: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी २७ सप्टेम्बर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. तर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले….

Read More

जिल्ह्यात कालपासून सुरू झाला नवरात्रोत्सव

१२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गामातेची प्रतिष्ठापणा ओरोस ता.२७-: जिल्ह्यात कालपासून मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. दुर्गामातेचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करीत प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपासून रात जागर सुरू झाला असून दांडिया, गरबा यासह विविध…

Read More

ऑल इंडिया धनगर महासंघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

राष्ट्रपती मुर्मु यांच्याकडे समस्या सोडविण्याची केली मागणी ओरोस ता २७धनगर समाजाच्या घटनात्मक हक्काची देय असलेले एस टी प्रमाणपत्राची त्वरित अंमल बजावणी करावी. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यासाठी निवेदन आज जिल्हा प्रशासना जवळ ऑल इंडिया धनगर समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मधुशंकर टिळे यांनी दिले.या निवेदनात…

Read More

वेत्ये कलेश्वर मंदिरात नवरात्रोत्सव कार्यक्रम सुरू

देवस्थान कमिटी अध्यक्ष मोहन गावकर यांनी केला शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.२७-: वेत्ये येथील श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात कालपासून नवरात्रौत्सवास सुरुवात झाली असून, या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मोहन गावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी गावचे सरपंच स्नेहा मिठबावकर, उपसरपंच तथा नवरात्रौत्सवास कमिटी अध्यक्ष…

Read More
You cannot copy content of this page