मळेवाड केंद्रस्तरीय बाल कला – क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ

⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळेवाड केंद्रस्तरीय बाल कला – क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परिषद केंद्र शाळा राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड शाळा नं. १ येथे करण्यात आला. यावेळी स्वागत, प्रास्ताविक, सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन, क्रीडाज्योत प्रज्वलन, क्रीडा प्रतिज्ञा, क्रीडांगण पूजन तसेच मान्यवरांच्या शुभेच्छा शुभारंभी प्रसंगी कार्यक्रम पार पडला.
मळेवाड जकात नाका व्यापारी संघाचे उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, केंद्रप्रमुख म. ल. देसाई यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश राऊत,उपाध्यक्ष रिया नाईक यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

व्यासपीठावरील मान्यवरांनी या महोत्सवा विषयी आपली मनोगत व्यक्त करून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. दोन दिवस चालणाऱ्या या केंद्रस्तरीय शालेय बाल कला क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मैदानी खेळ तसेच दुसऱ्या दिवशी समूह नृत्य आणि ज्ञानी मी होणार या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिक्षक संजय बांबुळकर, दीक्षा आडारकर, सीमा राठोड, गीता धर्णे ,स्मिता नाईक, संतोष रावण विशाखा कांबळी ,वामन परब, भूषण पाटील, शेळके सर, ग्रामस्थ रवींद्र तळवणेकर, भाऊ काळोजी, राजन परब, श्री कोचरेकर तसेच केंद्रबल गटातील सर्व उपशिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना म. ल. देसाई, स्पर्धेचे स्वरूप शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा मांजरेकर तर सूत्रसंचालन स्मिता नाईक व आभार प्रदर्शन लवू सातार्डेकर यांनी केले. एकूण केंद्रबल गटातील ८ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला.

You cannot copy content of this page