नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना धमकी म्हणजे महिला असुरक्षतेचा प्रश्न

खा विनायक राऊत यांचा आरोप

देवगड-,(प्रतिनिधी)
देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना भाजपा पक्षामध्ये येण्यासाठी आमदार नितेश राणे यांची धमकी हि महाराष्ट्राच्या राजकारणातील महिलांना असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. यामुळे नितेश राणे यांनी पुन्हा आमदार म्हणून निवडुन येण्याचे स्वप्न पाहु नये त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे मत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
देवगड शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते,नगराध्यक्षा साक्षी प्रभू,अतुल रावराणे, तालुका प्रमुख मिलिंद साटम, नगरसेवक बुवा तारी,संतोष तारी, रोहन खेडेकर,हर्षा ठाकुर,निनाद देशपांडे,संदिप डोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपा पक्षाच्या हातामधून सत्ता गेल्यानंतर त्यांचा फुगा फोडल्यानंतर आमदार नितेश राणे हे वैफल्या ग्रस्त झाले आहेत. यामुळे नगराध्यक्षा साक्षी प्रभू या विधवा महिला असल्याने त्यांना भाजपा पक्षाच्या एका महिलेव्दारे पैशाचे आमिष दाखवून व धमकी देवून त्यांना मानसिक त्रास देवून पक्ष प्रवेशाबाबत दबाव टाकला जात आहे. मात्र निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे प्रभू या असल्या धमकीला व आमिषाला बळी पडल्या नाहीत. अश्या या नितेश राणेंच्या अप्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करीत आहोत. जर नितेश राणे यांच्यामध्ये हिंमत असेल तर विचाराने व विकासकामे करुन जनतेला जवळ करा अप्रवृत्ती धमक्या देवून दुस-या पक्षाचे नगरसेवक फोडून सत्ता स्थापन करु नका तुम्हाला जनतेने नाकारले आहे. आता विधानसभेमध्येही नितेश राणे यांचा पराभव करुन डिपॉझिटही जप्त केले जाणार आहे. यामतदार संघामध्ये अपवृत्ती आणि धमक्या देणा-यांना जनता थारा देत नाही. नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या गरीबीचा फायदा घेण्याचे थांबवावे नितेश राणे ज्या भाजपाच्या महिला नगरसेवकाव्दारे नगराध्यक्षा प्रभू यांना संपर्क साधला त्याचे रेकॉर्डही जतन करुन ठेवण्यात आले आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील दिवाबत्ती वरील लाईट गेली अर्धातासासाठी पाणी पुरवठा खंडित झाला याही बाबींचे राजकारण आमदार नितेश राणे व त्यांच्या पक्षातील नगरसेवक करीत आहेत. नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला तर नितेश राणे यांची कुंडली लोकांसमोर मांडली जाईल हेही त्यांनी लक्षात ठेवावे. उध्दव ठाकरे सरकारच्या काळामध्ये देवगड जामसंडे व देवगड तालुक्यामधील अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती मात्र या शिंदे सरकारने या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. यामुळे हे सरकार गतिमान नसून स्थगिती सरकार आहे. रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी राजकीय दलालांनाच मोठी आस लागली आहे. या राजकीय दलालांना लोकांचे हित जोपासायचे नसून त्यांना राज्यातील व राज्या बाहेरील विकत जमिन घेतलेल्या जमिन धारकांना फायदा करुन दयायचा आहे. असे मत पत्रकार परिषदेमध्ये खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page