भूमी अभिलेख कार्यालयातील अनंत दळवी यांचे सेवानिवृत्त कार्यक्रमात प्रतिपादन
देवगड-प्रतिनिधी
प्रामाणिकपणे काम केले कि शासकीय नोकरी करीत असताना कोणताही अडथळा निर्माण होत नाही. याच तत्वावरती आपण भुमिअभिलेख कार्यालयात काम करीत असताना जास्तीत जास्त जनतेला अर्जानुसार तात्काळ नकाशाची प्रत देण्याचे काम केले. वरिष्ठांचेही व जनतेचे सहकार्य मिळाल्यामुळेच आपण आज नोकरीमधून सेवानिवृत्त झालो आहोत असे मत मालवण भुमिअभिलेख कार्यालयातील व सदया देवगड भुमिअभिलेख दप्तदार पदावरती काम करीत असलेले अनंत दळवी यांनी सेवा निवृत्तीपर सत्कार कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केले.
देवगड भुमि अभिलेख कार्यालयामध्ये नियुक्ती मालवणला असलेले मात्र कामगिरीवरती देवगड कार्यालयामध्ये काम करीत असलेले दप्तरदार अनंत दळवी यांचा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम देवगड भुमिअभिलेख कार्यालयामध्ये करण्यात आला होता. यावेळी देवगड भुमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सेवा निवृत्तीपर कार्यक्रमाला बोलताना दळवी म्हणाले की, शासकीय नोकरीमध्ये काम करीत असताना जनतेचे सहकार्य हे नेहमीच महत्वाचे असते त्यासाठी आपण प्रमाणिकपणे काम केले पाहिजे. याच तत्वावरती आपण काम केले असून वरिष्ठांचे मिळालेले मार्गदर्शन व जनतेने दिलेली साथ यामुळेच आज आपण यशस्वीरित्या सेवानिवृत्त झालो आहोत असे त्यांनी मत व्यक्त केले.
फोटो- देवगड भुमिअभिलेख कार्यालयातील सेवानिवृत्तीपर अनंत दळवी यांना भेटवस्तू देताना अधिकारी व कर्मचारी वर्ग.
