⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभ बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डी. पी. डी. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला, असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्र.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली.
जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र सेना ध्वज दिन २०२२ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी या तसेच कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ,अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
