⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, सहकारी संस्था, बिगर सरकारी संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी व पान टपरी, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेलस अशा ठिकाणी वेंगुर्ला तालुक्यामध्ये तंबाखू नियंत्रण समितीने धाड सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या धाडसत्रामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व वेंगुर्ला पोलिस विभागामार्फत तालुक्यातील 18 ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुपये 3 हजार 800 व पोलिस प्रशासन मार्फत रुपये 1 हजार 200 असे एकूण रुपये 5 हजार एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली,असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली* .
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा-2003 (कोटपा) मधील प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सामितीमार्फत धाड टाकण्यात आली. या धाड पथकाध्ये जिल्हा रुग्णालय येथील प्रभारी जिल्हा सल्लागार NTCP, संतोष खानविलकर, सायकॉलॉजिस्ट किरण कनकुटे, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस अल्मेडा, समुपदेशक अश्विनी शेटकर तसेच वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक जाधव पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश पालकर,महिला पोलिस प्रज्ञा मराठे, महिला पोलीस प्रतिक्षा कोरगावकर इत्यादींनी या धाड पथकात सहभाग घेतला होता.
