⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय तसेच जिल्हा एकविध खेळ संघटना याचे संयुक्त विद्यमाने सन २०२२-२३ या सत्रातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हयातील खालील नव्याने समावेश झालेल्या विनाअनुदानित खेळ प्रकारातील अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ. संघटनाचे पदाधिकारी यांची यादी, पंच यादी तसेच जिल्हास्तर एकविध क्रीडा संघटना नोंदणी प्रमाणपत्र, जिल्हास्तर संघटना अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असल्याचे पत्र, स्पर्धेसाठी आर्थिक व तांत्रिक सहकार्य करण्यास तयार असल्याबाबतचे पत्र ही कागदपत्रे दिनांक ०५ डिसेंबर २०२२ पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावयाची आहेत.
बेल्ट रेसलीग, थांग ता मार्शल आर्ट, बीच व्हॉलीबॉल, कॉर्फबॉल,जंपरोप, पेन्टाक्यू, मीनी गोल्फ, हाफकिड़ो बॉक्सींग, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, युग मुन दो, टार्गेटबॉल,पॉवरलिफ्टींग, फुटसल, वोवीनाम, फ्लोअरबॉल, स्पोर्ट डान्स, वूडबॉल, रस्सीखेच, आष्टे-डू-आखाड, टेबल सॉकर, टेनिस व्हॉलीबॉल, म्युजिकल चेअर, युनिफाईट, टेंग -सु-डो, ग्रॅपलिंग, फिल्ड आर्चरी, बुडो, कुडो, हुपक्वॉन दो, चॉकबॉल, फुटबॉल टेनिस, लगोरी, टेनिस क्रिकेट, कुराश, ड्रॉप रोबॉल, चॉयक्वांदो, स्पीडबॉल, सुपर सेव्हन क्रीकेट, टनिस बॉल क्रिकेट. वरील खेळाची विहित माहिती सादर न करु शकल्यास सदरील खेळांचे कार्यक्रम आयोजन करणे अशक्य आहे. याची नोंद घेवून आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी.असे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कळविले आहे.
