सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवी कार्यकारणी जाहीर; दैनिक ‘सामना’तून नियुक्तीची घोषणा..
⚡सावंतवाडी, ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत सावंतवाडी तालुका संघटकपदी निशांत तोरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीची घोषणा पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधून करण्यात आली.
सावंतवाडी तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने तोरस्कर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.
निशांत तोरस्कर यांच्या निवडीबद्दल ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
