Headlines

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात वैभववाडीत शिवसेनेचा एल्गार…

⚡वैभववाडी ता.०३-: या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय!” अशा आक्रमक घोषणांनी बुधवारी वैभववाडी शहर दणाणून सोडले. स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढत सरकार आणि प्रशासनाला विविध प्रश्नांवर धारेवर धरले.
​शिवसेना कार्यालयातून निघालेला मोर्चा संभाजी चौक, दत्तमंदिरमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चा महावितरणच्या वैभववाडी कार्यालयावर नेण्यात आला. फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
​यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत-पालव, माधवी दळवी, तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​‘आनंदाचा शिधा गेल्या वर्षी; मग यावर्षी का नाही?’ तहसील कार्यालयात मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार सुतार यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. गेल्या वर्षी प्रत्येक रेशनकार्डधारकाला ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. यावर्षी त्याचे वाटप होणार का, असा सवाल वैभव नाईक यांनी केला. पुरवठा अधिकारी दांडगे यांना केला मात्र, यावर्षी
आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. यावर सुशांत नाईक म्हणाले, आता कोणत्या निवडणुका नाहीत का? गेल्या वर्षी आनंदाचा शिधा होता, मग यावर्षी का नाही? आता वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक आहे ना, असा खोचक सवाल उपस्थित केला. रेशनकार्डधारकांची गैरसोय टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या काळात गॅस ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व गॅस एजन्सींना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली. वाढती महागाई व इतर मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे वैभव नाईक यांनी प्रशासनाला सांगितले.
महावितरण कार्यालयाला ही धडक
यानंतर मोर्चा महावितरणच्या वैभववाडी कार्यालयावर पोहोचला. यावेळी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून महावितरणच्या अधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले.राज्याचे मुख्यमंत्री ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याचे सांगत असताना, प्रत्यक्षात मात्र ग्राहकांच्या संमतीशिवाय तालुक्यात स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत सुमारे ३० टक्के स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा दावा करत वैभव नाईक यांनी या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला.
“जेव्हा अदानीचे शंभर टक्के स्मार्ट मीटर बसविले जातील, तेव्हा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे काय होणार?” असा सवालही
तालुक्यात वीज वितरण आणि आरोग्य यंत्रणेची स्थिती दयनीय झाली असून अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अपुऱ्या मनुष्यबळामुळे संबंधित यंत्रणा कोलमडल्या असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून वैभववाडीच्या जनतेवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, या विरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले. “या तालुक्याकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरविली आहे का, असा सवाल त्यांना विचारण्याची वेळ आली आहे,” असे सुशांत नाईक यावेळी म्हणाले.
​स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, महागाईवर नियंत्रण आणणे, रेशनकार्डधारकांना सुलभ धान्य वितरण करणे तसेच गणेशोत्सव काळात गॅस पुरवठा सुरळीत ठेवणे आदी मागण्या प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
​यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे महिला तालुकाप्रमुख दिव्या पाचकुडे, कणकवली महिला आघाडी प्रमुख माधवी दळवी, तालुका सचिव गुलजार काझी, तालुका संघटक लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, अशोक रावराणे, नगरसेवक मनोज सावंत, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख जावेदा पाटणकर, स्वप्नील रावराणे, वसंत खानविलकर, जितू तळेकर, यशवंत गवाणकर, मानसी सावंत अर्चना कोरगावकर, संतोष पाटील, पंढरी सर्वे, सुरेश पांचाळ,आदी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महागाव विरोधात मोर्चात सहभागी झालेले माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक सुशांत नाईक नंदू शिंदे आदी शिवसैनिक
तहसीलदार यांच्या बरोबर चर्चा करताना वैभव नाईक सुशांत नाईक नंदू शिंदे आधी शिवसैनिक
महावितरण अधिकारी यांना धारेवर धरताना शिवसैनिक पदाधिकारी छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page