विठ्ठल कदम;कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे तालुकास्तरीय वाचक स्पर्धा संपन्न
*
⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: ज्या स्पर्धकांनी या वाचन स्पर्धेत भाग घेतला अणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर वाचन करून आले ते सर्वजण या स्पर्धेतील यशाचे मानकरी आहेत, असे प्रतिपादन कवी श्री. विठ्ठल कदम यांनी मळगाव येथे केले.
कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा २०२२ वाचनालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी कदम बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, संचालक राजू बांदेकर, भरत गावडे, ग्रंथपाल आनंद देवळी आदी उपस्थित होते.
,यावेळी विठ्ठल कदम यांनी उदय खानोलकर वाचन मंदिर मध्ये होणार्या कार्यक्रमाची व वाटचाली बाबत कौतुक केले. या सावंतवाडी तालुकास्तरीय वाचक स्पर्धेसाठी मधु मंगेश कर्णिक त्यांचे साहित्य हा विषय होता. या स्पर्धेत नेमळे येथील संध्या राऊळ यांनी प्रथम , द्वितीय विभागून कोलगाव येथील अंकिता नाईक व केसरी येथील प्रगती परांजपे, तर तृतीय क्रमांक सीमा पंडित यांनी मिळविला. यावेळी उदय खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने यशस्वी स्पर्धकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण श्री. विठ्ठल कदम, भरत गावडे यांनी केले. यातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांची जिल्हा स्तरावर ४ डिसेंबर रोजी स्पर्धा कुडाळ येथे होणार आहे.
