सा. बां. विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची संकेत धुरी यांची मागणी
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ टांक येथे वेंगुर्ला शिरोडा या मुख्य महामार्गाजवळ चर्च नजिक असलेल्या दर्ग्याजवळ मुख्य रस्त्यावरून रिक्षा खाली पडून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत व रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.सदर रिक्षा शिरोडा ते वेंगुर्ला अशी प्रवासी घेऊन जात होती.सागरतीर्थ- टांक येथील चर्च ते रस्त्याच्या सखल भागात असलेल्या छोट्या दर्ग्यापर्यंत रस्ता काहीसा अरुंद असल्याने वारंवार वाहने त्या ठिकाणी कोसळून अपघात होत आहेत. याबाबत माहिती मिळतात भाजपाचे आसोली पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, सागरतीर्थ, न्हईचीआड, शिरोडा ग्रामस्थ, पोलीसपाटील श्री. चोपडेकर, आसोली पोलीसपाटील निलेश पोळजी तसेच अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले. जखमी
प्रवाशांना ग्रामस्थांनी तात्काळ शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले. मागील कालावधीत संबंधित एरियात अशाप्रकारे हा तिसरा अपघात झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी यांनी केली आहे. संकेत धुरी यांनी मुख्य मार्ग खड्डे बाबत पाठपुरावा केल्यानंतर सागरतीर्थ मुख्यमार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.
