Headlines

Global Maharashtra Breaking News

इन्सुली चेकनाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

दोघे संशयित ताब्यात: चार लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ⚡​बांदा ता.०९-: इन्सुली चेकनाक्यावर बांदा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत मालवण येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ८३ हजार रुपयांच्या दारुसह एकूण ४ लाख २ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read Full News

शाळांमधून बेकायदेशीर वह्या पुस्तके विक्रीची सखोल चौकशी होणार…

जि प अध्यक्षांचे शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश:रुपेश पावसकर यांनी घेतली अध्यक्षांची भेट.. कुडाळ : शाळा व संस्था मार्फत वह्या पुस्तके यांची होणारी बेकायदेशीर विक्री संदर्भात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी अध्यक्ष प्रमोद कामात यांचे लक्ष वेधले. त्यावर अध्यक्ष श्री. कामत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये बेकायदेशीर वह्या…

Read Full News

नागपूरच्या धर्तीवर ओटीपी विरहीत सिलेंडर गँसची सेवा द्या…

जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी:गॅस सिलेंडर ४ दिवस आधी बुक करा, अन्यथा ७ दिवसांनी बुकिंग रद्द – गॅस डीलर्स असोसिएशनचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरा ता ९-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या एलपीजी गॅस वितरकांनी सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व गॅस ग्राहकांना संघटनेचे खजीनदार नंदकिशोर करावडे यानी पत्रकार परीषदेतुन आवाहन केले आहे. तर नागपूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग…

Read Full News

वाडातर घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा…

पाच लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त, संशयित गजाआड.. ⚡देवगड ता.०९-:वाडातर येथील एका घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत देवगड पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले असून या प्रकरणातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक…

Read Full News

सीईटी सेलचा ‘विभागीय सुसंवाद २०२६’ उत्साहात संपन्न…

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील विभागीय सुसंवाद कार्यक्रम आज यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर…

Read Full News

१४ कामे स्वखर्चातून केली असतील तर मी गटनेता पदाचा राजीनामा देईन…

अन्यथा सामंतांनी जिल्हाध्यक्ष पद सोडावे” – दिपक सुर्वे यांचा इशारा.. ⚡मालवण ता.०९-:खोटे बोला पण रेटून बोला ही आतापर्यंतची दत्ता सामंत यांची राजकीय नीतीच राहिली आहे. त्यामुळे जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्व:खर्चातून १४ विकासकामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी आपल्या शिवसेना…

Read Full News

वैभव नाईक यांच्या चौकशीत पक्षपातीपणा ; प्रसंगी शिवसेना स्टाईल उत्तर…

ठाकरेसेनेचे अमरसेन सावंत यांनी दिला थेट इशारा :कालेली ग्रामस्थांचा ठाकरेसेनेवरच विश्वास .. ⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी पक्ष आणि सर्व शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत. शासकीय यंत्रणांचा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सर्रास गैरवापर करून सुरू असलेल्या चौकशांना वेळ पडल्यास ‘शिवसेना शैली’त चोख उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा…

Read Full News

आडाळी एमआयडीसीतील खनिज उत्खनन प्रकरण तापले; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा…

दोडामार्ग : तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध खनिज उत्खननाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तसेच एमआयडीसी कार्यालय, कुडाळ यांना निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ व दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करा…

नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी नगरपरिषदेस तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषद ही जिल्ह्यातील जुन्या नगरपरिषदांपैकी एक असून…

Read Full News

अखेर आडेली श्री देव सोमेश्वर सोसायटी बोअरवेलद्वारे आंबेडकरनगर मध्ये पाणी उपलब्ध…

उदय आडेलकर ; प्रकाश गडेकर यांच्यामार्फत 25 हजार रु.स्वखर्चातून पाईपलाईन.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा हंगाम तोंडावर आला तरी वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकांना नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने व जुन्या विहिरीवरील पाणीसाठा पूर्णतः कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत शासन स्तराकडे येथील उत्कर्ष कार्यकारिणी समिती अध्यक्ष उदय आडेलकर यांनी गेले महिनाभर कालावधीत पाठपुरावा…

Read Full News

You cannot copy content of this page