अन्यथा सामंतांनी जिल्हाध्यक्ष पद सोडावे” – दिपक सुर्वे यांचा इशारा..
⚡मालवण ता.०९-:
खोटे बोला पण रेटून बोला ही आतापर्यंतची दत्ता सामंत यांची राजकीय नीतीच राहिली आहे. त्यामुळे जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्व:खर्चातून १४ विकासकामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी आपल्या शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान चिंदर पंचायत समिती सदस्य तथा मालवण पंचायत समिती भाजपा गटनेते दिपक सुर्वे यांनी दिले आहे.
मालवण पंचायत समितीमधील भाजपाचे गटनेते दिपक सुर्वे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आपली भुमिका मांडली आहे. आता चिंदर गावची निवडणूक जवळ आली आहे म्हणून दत्ता सामंत यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चिंदर गाव दिसला. यापूर्वी कधी का नाही दिसला ? ऍडव्हान्स मध्ये रस्ते करतो असे लोकांना सांगायचे आणि नंतर आमदार खासदार निधी मिळवायचा हे सामंत यांचे नेहमीचे काम आहे. चिंदर गाव हे भौगोलिक दृष्ट्या मालवण तालुक्यातील सर्वात मोठे गावं आहे, त्यात काही पाणंद राहिल्या, त्यातले २- ३ पाणंद काम केले असेल. बाकी ठेकेदारी घेतलेलेच निकृष्ट कामे परत करायला भाग पाडली. आता खर्च केलेले पैसे हे आमच्या गावातील निकृष्ट कामातून उरलेल्या पैशातूनच असतील, असा आरोप दीपक सुर्वे यांनी केला असून तूर्तास एवढेच सांगतो, बाकी आवश्यकता भासेल तेव्हा अधिक सांगेन, असा इशाराही दिपक सुर्वे यांनी दिला आहे.
