शाळांमधून बेकायदेशीर वह्या पुस्तके विक्रीची सखोल चौकशी होणार…

जि प अध्यक्षांचे शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश:रुपेश पावसकर यांनी घेतली अध्यक्षांची भेट..

कुडाळ : शाळा व संस्था मार्फत वह्या पुस्तके यांची होणारी बेकायदेशीर विक्री संदर्भात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी अध्यक्ष प्रमोद कामात यांचे लक्ष वेधले. त्यावर अध्यक्ष श्री. कामत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये बेकायदेशीर वह्या पुस्तके व स्टेशनरी यांची विक्री करून पालक व विद्यार्थ्यांकडून अमाफ फी आकारली जात आहे. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी जि. प.अध्यक्ष यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून सदर बाब अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अध्यक्षांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तर गोरगरीब विद्यार्थी व पालकांना होणार भुर्दंड अन्यायकाक असून निंदनीय असल्याचे रुपेश पावसकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page