Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात रंगणार इंस्टाग्राम रिल्स स्पर्धा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आगळीवेगळी स्पर्धा ⚡कणकवली ता.२२-: दरवर्षी कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भरणा असतानाच यावर्षी कणकवली नगरपंचायतच्यावतीने पर्यटन महोत्सव 2023 च्या निमित्ताने इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. ही एक आगळीवेगळी स्पर्धा घेत कणकवलीकरांना एक नवीन व्यासपीठ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात आले आहे. इंस्टाग्राम…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचे संतसेवा पुरस्कार जाहीर

सिताराम परब, गणपत पांचाळ, रामचंद्र गाड मानकरी ⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे मानाचे संतसेवा पुरस्कार२०२२* यावर्षी ह.भ.प.सिताराम परब आंब्रड ता.कुडाळ,ह.भ.प.गणपत पांचाळ आखवणे ता.वैभववाडी, ह.भ.प.रामचंद्र गाड सासोली ता.दोडामार्ग यांना जाहीर करण्यात आले. पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत पुरस्कारासाठी आलेल्या अर्जातून यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा जिल्हा मेळावा…

Read More

युवा पिढीने चांगले आदर्श समोर ठेवून कार्य करावे

डॉ.राजश्री साळुंखे;वागदे येथे विशेष निवासी संस्था शिबिराचे उद्घाटन ⚡कणकवली ता.२२-: युवा पिढीने आप्पासाहेब पटवर्धन, केशवराव राणे यासारख्या लोकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कार्य करावे. शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचल्यानंतर सुद्धा आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडलेली असणे आवश्यक आहे. देशाच्या प्रगतीमध्ये युवा नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे, असे मत डॉ. राजश्री साळुंखे, चेअरमन, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली यांनी व्यक्त…

Read More

मुलांचं भविष्य संस्कारक्षम आणि बालपण समृद्ध बनवा

वैशाली राजमाने;फोंडाघाटच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात ⚡कणकवली ता.२२-: मुलं- विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नातं नेहमी सौदार्याचे असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पालकांना चुकीचे ठरवण्याची पाळी मुलांवर येणार नाही, याची काळजी घेऊन मुलांचे बालपण समृद्ध करा. संस्थेने सुद्धा मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जाणाऱ्या मुलांना अभ्यासाकडे वळविण्यासाठी संस्कारक्षम उपक्रम राबवावेत. आई-वडील अथवा वडीलधाऱ्यांच्या विषयी…

Read More

श्री. संत गाडगेबाबांचे विचार जनमानसात पोचविणे गरजेचे;

दिलीप भालेकर यांचे प्रतिपादन; गाडगेबाबांचा पुण्यतिथी उत्सव सावंतवाडीत उत्साहात साजरा.. सावंतवाडी ता.२२-: परीट समाज बांधवांनी एक संघ राहून श्री संत गाडगेबाबा यांचे विचार जनमानसात पोहोचविणे फार गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने गाडगे बाबांची पुण्यतिथी आपण साजरी केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले….

Read More

हार्दिक शुभेच्छा

💐हार्दिक शुभेच्छा…!💐हार्दिक शुभेच्छा…!💐हार्दिक शुभेच्छा…💐 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💐🚩शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत सरपंच पदाच्या उमेदवार श्री. गुणाजी गावडे वेत्ये ग्रामपंचायतीवर बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!!🚩💐 ▪️साई राणें ▪️शेखर खंबल ▪️शवियर फर्नांडिस ▪️ राजन आंबेरकर 🚩🙏🏻वेत्ये गावातील तमाम मतदार, ग्रामस्थ, हितचिंतक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते…!🙏🏻🚩 🙏🏻मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे…

Read More

ख्रिसमस सणाच्या निमित्ताने मालवण येथे विविध स्पर्धाचे आयोजन

सामाजिक युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी दिली माहिती ⚡मालवण ता.२१-: ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मालवण शहर मर्यादित गोठे सजावट स्पर्धा तसेच चांदणी बनवणे (स्टार) स्पर्धा या बरोबरच कॅरल सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मालवणचे सामाजिक युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे….

Read More

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकवू : हरी खोबरेकर

अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत ठाकरे पक्षाला अपेक्षित यश ⚡मालवण ता.२१-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी गेल्या काही महिन्यांचा काळ संकटांचा गेला तरीही मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने १९ ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. अनेक प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले. भाजपचा गड असणाऱ्या काही ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता मिळविली असून किनारपट्टी भागात भाजपचा सुपड़ा…

Read More

माळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा विजय मात्र ठाकरे शिवसेना पक्षाचे वर्चस्व

या ग्रा. पं. च्या सात पैकी सहा जागा ठाकरे गटाकडे ⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी या ग्रा. पं. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. या ग्रा. पं. च्या सात पैकी सहा जागा ठाकरे गटाकडे आल्या आहेत. यापूर्वी या ग्रा. पं. वर भाजपचे…

Read More

मालवण निवडणुकीत नव्या उमेदीच्या चेहेऱ्याना संधी तर प्रस्थापितांना धक्के

मतदार राजाने नवा गडी नवा राज्य चा प्रयोग केल्याचे चित्र ⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी काल पार पडल्यानंतर या निवडणुकीत मतदारांनी नव्या उमेदीच्या चेहेऱ्याना संधी देतानाच अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के दिले आहेत. काही ठिकाणी नवनिर्वाचित युवा सरपंच विराजमान झाले आहेत तर सरपंच पदाचा कारभार काही ठिकाणी महिलांच्या हाती गेला आहे त्यामुळे मालवण…

Read More
You cannot copy content of this page