सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचे संतसेवा पुरस्कार जाहीर

सिताराम परब, गणपत पांचाळ, रामचंद्र गाड मानकरी

⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे मानाचे संतसेवा पुरस्कार२०२२* यावर्षी ह.भ.प.सिताराम परब आंब्रड ता.कुडाळ,ह.भ.प.गणपत पांचाळ आखवणे ता.वैभववाडी, ह.भ.प.रामचंद्र गाड सासोली ता.दोडामार्ग यांना जाहीर करण्यात आले.


पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत पुरस्कारासाठी आलेल्या अर्जातून यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा जिल्हा मेळावा रविवार २५ डिसेंबर २०२२ सावंतवाडी येथे होत असून या मेळाव्यात हे पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या निवडीच्या वेळी जिल्हा सचिव राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकार उपस्थित होते

You cannot copy content of this page