दिलीप भालेकर यांचे प्रतिपादन; गाडगेबाबांचा पुण्यतिथी उत्सव सावंतवाडीत उत्साहात साजरा..
सावंतवाडी ता.२२-: परीट समाज बांधवांनी एक संघ राहून श्री संत गाडगेबाबा यांचे विचार जनमानसात पोहोचविणे फार गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने गाडगे बाबांची पुण्यतिथी आपण साजरी केल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी खासकीलवाडा येथील वटसावित्री सभागृहात श्री संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी बाजारपेठेतील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथे साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वटसावित्री सभागृहात पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री व सौ किरण वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीट समाज बांधवांची बैठक झाली. त्यात जिल्हा व तालुका दौरा करून लवकरात लवकर कार्यकारणीची पुनर्बांधणी करण्याचे ठरविण्यात आले.यावेळी ह.भ.श्री विनायक आजगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.नंतर महाप्रसाद घेण्यात आला.
यावेळी परीट समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री मधुकर मोरजकर, जगन्नाथ वाडकर, मनोहर रेडकर, देवेंद्र होडावडेकर, लक्ष्मीदास आजगावकर, रामा कुडाळकर व दहावीत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल यश मडवळ यांचा सत्कार समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण बांदेकर, सेक्रेटरी योगेश आरोलकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, शहराध्यक्ष दयानंद रेडकर, युनियनचे अध्यक्ष प्रदीप भालेकर आदि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर राणी जानकीबाई सुतीकागृह व कुटीर रुग्णालय येथे फळे व प्रसाद वाटप आले. सायंकाळी भजन व विविध कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, संजय होडावडेकर माजी नगरसेविका दिपाली भालेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, लक्ष्मण बांदेकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, रितेश चव्हाण, सुरेंद्र कासकर, भगवान वाडकर, प्रकाश लोकळे, किरण वाडकर, दिनेश होडावडेकर, संतोष मडवळ, संदीप बांदेकर, शशिकांत परीट, अनिल होडावडेकर, सुरेश पन्हाळकर, प्रदीप भालेकर, प्रवीण मोरजकर, दयानंद रेडकर, वरुण भालेकर, मनोहर रेडकर, ज्ञानेश्वर भालेकर, देवेंद्र होडावडेकर,सुनील होडावडेकर यांनी व समाजातील महिला भगिनींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रदीप भालेकर यांनी तर आभार जितेंद्र मोरजकर यांनी मानले.यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
