माळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा विजय मात्र ठाकरे शिवसेना पक्षाचे वर्चस्व

या ग्रा. पं. च्या सात पैकी सहा जागा ठाकरे गटाकडे

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील माळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी या ग्रा. पं. वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. या ग्रा. पं. च्या सात पैकी सहा जागा ठाकरे गटाकडे आल्या आहेत. यापूर्वी या ग्रा. पं. वर भाजपचे बहुमत होते. मात्र भाजपने सरपंच पद मिळवूनही ही ग्रा. पं. आता शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे.

या ग्रा. पं. मध्ये अंकिता आनंद कासले, शशिकांत बाळकृष्ण सरनाईक, किरण दुर्गादास नरे, राजश्री रामचंद्र शेलार, नंदकिशोर सूर्यकांत कासले, श्रीनिवास वसंत हडकर हे शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य विजयी झाले आहेत. या ग्रा. पं. मध्ये भाजपचे विद्यमान सरपंच निलेश खोत यांना शिवसेना ठाकरे गटाच्या श्रीनिवास वसंत हडकर यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये पराभूत केले.

You cannot copy content of this page