Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी बांदा भाजप कडून जय्यत तयारी…

सरपंच अक्रम खान आणि माजी सभापती शीतल राऊळ यांची माहिती बांदा/प्रतिनिधीसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे शनिवार दिनांक ५ रोजी जिल्ह्यात येणार असून त्यांच्या स्वागताची बांदा येथे शहर भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान, माजी सभापती शीतल राऊळ यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री चव्हाण यांनी…

Read More

वेंगुर्ले न.प. प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांचा राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सन्मान

⚡वेंगुर्ले ता.०२-:  वेंगुर्ले नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र : एमजेएफ अवॉर्ड’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्त वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विधाता सावंत, महिला शहर अध्यक्ष…

Read More

दीपावली निमित्त आयोजित करण्यात किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

⚡बांदा ता.०२-: ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे दीपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपावली किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बांदा शहर मर्यादित घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण बावीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.दिनांक २८ व २९ ऑक्टोबरला स्पर्धेचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.प्रथम – शिवानंद संतोष परब, आंगडीवाडी, बांदा, द्वितीय- श्लोक बहिरे, निमजगा-बांदा,…

Read More

गुळदुवे खरी बसस्टॉपवर काही दारू पिणाऱ्या अज्ञातांवर कारवाई करा

मनसे लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांची आरोंदा पोलीस निरीक्षकांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: गुळदुवे खरी बसस्टॉपवर काही अज्ञात लोक दारू पिऊन कचरा तिथेच उडवत आहेत. तसेच याठिकाणी असलेल्या सोलर लाईटही या दारू पिणाऱ्या अज्ञातांकडून चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे तिथे दारू पिण्यासाठी बसणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश लक्ष्मण…

Read More

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंथा मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेला महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन मुंबई यांच्याकडुन दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार पनवेल मुंबई येथे राज्य महिला आयोग अध्यक्ष मा. रुपालीताई चाकणकर, मा. आमदार अदिती सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन १९९१ मध्ये मुहुर्तमेढ रोवलेल्या या संस्थेने रुपये…

Read More

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सोहम जांभोरे, पुजा राणे तर जोडी नृत्यमध्ये एम.जे. ग्रुप प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०२-: दिवाळी निमित्त नितीश कुडतरकर यांनी वेंगुर्ला-माणिकचौक येथे आयोजित केलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात सोहम जांभोरे, मोठया गटांत पुजा राणे तर जोडी नृत्य स्पर्धेत एम.जे.ग्रुप यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

Read More

मुख्याध्यापक प्रकाश जाधव सेवानिवृत्त

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी. रेगे कनिष्ठ महाविद्यालय तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रमाचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव हे प्रदीर्घ ३९ वर्षाच्या यशस्वी सेवेनंतर नियत वयोमानानुसार ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त दहावीच्या १९९३ बॅचचे विद्यार्थी विजय गावडे, संदीप गावडे, तुषार कासार, विवेक राऊळ, प्रविण गिरप यांच्या हस्ते त्यांना गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात…

Read More

वेंगुर्ल्यात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी चाचणी परीक्षा

⚡वेंगुर्ला ता.०२-: माजी विद्यार्थी संघ-न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, अभिनव फाऊंडेशन-सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी ३० मुलामुलींची निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read More

वेंगुर्ला आगारातर्फे धार्मिक यात्रांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला आगारातर्फे नुकत्याच झालेल्या अष्टविनायक यात्रेच्या यशस्वी उपक्रमानंतर दि. ६ नोव्हेंबरला प्रति बालाजी, जेजुरी आणि अष्टविनायक यात्रेसाठी बस सोडण्यात येणार आहे. एका प्रवाशासाठी २७०० रुपये आकारले असून एका बसमध्ये ४० प्रवाशांचे नियोजन केले आहे. तर पुढील अष्टविनायक यात्रेची तारीख बुकींगप्रमाणे जाहीर केली जाणार आहे.

Read More

रस्त्यांवरील खड्डयांवर कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील चार मुख्य महामार्ग संपूर्ण खड्डेमय झाले असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांवर त्वरित खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच साईडपट्टी व रस्त्याच्या लगत वाढलेली झाडे तोडून साफ करण्यात यावी. रस्त्यांबाबत कार्यवाही न झाल्यास १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आमरण उपोषण केले जाई असा ईशारा…

Read More
You cannot copy content of this page