आशिये येथील ग्रामदैवत गांगो-भैरीचा उदया जत्रोत्सव

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील आशिये येथील ग्रामदैवत गांगो-भैरीचा वार्षिक जत्रोत्सव ३० डिसेंबर रोजी होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्त सकाळी ८ वाजता देवतांची नित्य पूजा, दुपारी 3 वाजता माहेरवाशीणींचा ओट्या भरण्याचा कार्यक्रम,सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत भगवती ढोल पथक आंब्रड यांचा ढोल व सनई वादनाचा कार्यक्रम, रात्री १० वाजता कोटेश्वर प्रासादिक मंडळ भजन हरकुळ बु.बुवा अभिषेक शिरसाठ यांचे संगीत भजन, रात्री १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आशिये ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page