Headlines

वेंगुर्लाची आमसभा शांततेत व पंचायत समितीच्या सुयोग्य नियोजनात संपन्न….!

भाजपचे हितेश धुरी, भूषण आंगचेकर, कमलेश गावडे आक्रमक….

वेंगुर्ला
प्रदीर्घ कालावधीनंतर वेंगुर्लाची आमसभा वेंगुर्ला न. प. नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आ. दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली. वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांनुसार एमईसीबी, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग यांची सभापती, उपसभापती संबंधित विभागाचे उपअभियंता व संबंधित गावातील ग्रामस्थ, शिक्षण व आरोग्य सभापती यांची संबंधित गावांमध्ये तातडीने “विशेष बैठका ” घेऊन श्री गणेश चतुर्थी सणापूर्वी अधिकाधिक तोडगा काढण्याचे आदेश आमदार दिपक केसरकर यांनी आज सोमवारी दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या वेंगुर्ला येथील आमसभेत दिले.तसेच श्री गणेश चतुर्थी पूर्वी
नगरपरिषद कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत मुख्याधिकारी व तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना तातडीने उपाययोजना व अंमलबजावणी करण्याचे आदेश आमदार दिपक केसरकर यांनी आमसभेत दिले. वेंगुर्ला पंचायत समितीच्या सुयोग्य नियोजनात प्रदीर्घ कालावधीनंतर झालेली वेंगुर्ला आमसभा काहीअंशी राजकीय पदाधिकारी, नागरिकांच्या आक्रमकतेनंतरही शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडली. आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग ची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने नियोजनबद्ध सभा हाताळली. यावेळी आमसभेस व्यासपीठावर माजी आमदार शंकर कांबळी, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे,पं. स. उपसभापती सचिन देसाई, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार राजन गवस, वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती दादा कुबल, उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे, आडेली जि. प. सदस्य विजय नाईक, तुळस जि. प. सदस्य सुजाता पडवळ, म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, म्हापण पं. स. सदस्य विष्णू उर्फ आप्पी फणसेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, माजी सभापती तथा तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर, उभादांडा पं. स. सदस्या साक्षी नार्वेकर, रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, वेंगुर्ला नगरपरिषद बांधकाम समिती सभापती प्रणव वायंगणकर, महिला व बालकल्याण समिती सभापती गौरी मराठे, उपसभापती रिया केरकर, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती गौरी माईंणकर, नगरसेविका शितल आंगचेकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी सभापती सुनील मोरजकर, योगेश तेली, पं. स. अधिकारी, महेश नाईक,
अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. दिपक केसरकर व सभापती शंकर घारे यांच्या हस्ते दिपपप्रज्वलन करून आमसभेत सुरुवात झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आशा भोसले, माजी जि. प. अध्यक्ष सरोज परब, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी कुबल यांच्या निधनाबद्दल सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वंप्रथम शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, पालकमंत्री, अन्य नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले. कोकण विभागाचा आदर्श पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, पालकमंत्री, खासदार तसेच तालुक्यातील दहावी व बारावी तील प्रथम तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांच्या अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले. या सभेत सभापती शंकर घारे यांच्या हस्ते आ. दिपक केसरकर, माजी आ. शंकर कांबळी व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भूषण आंगचेकर यांनी शिरोडा ताज प्रकल्पाबाबत ना. राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
भाजपाचे पदाधिकारी रितेश धुरी व भूषण आंगचेकर यांनी विविध मुद्द्यांवर “आक्रमक भूमिका” घेत तातडीने संबंधित विषयावर यावर लक्ष घालून कार्यवाही करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. पाल येथील भाजपा पदाधिकारी कमलेश गावडे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे यांनीही सभागृहात “आक्रमक भूमिका” घेत तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी आग्रही मागणी केली.
यावेळी विशेषतः उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांनी व्यासपीठावर न थांबता उपस्थित नागरिकांसमवेतच बसून आक्रमक होत नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी शिरोडा वेळागर प्रश्नाबाबत सकारात्मक पाठिंबा देण्याचे जाहीर केले. ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सुमन कामत, वैभव फटजी यांनी मोकाट गुरांबाबत योग्य अंमलबजावणीची सूचना मांडली. वेंगुर्ला तालुक्यात ठीकठिकाणी बसविण्यात आलेले रंबलर गतिरोधक नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून याबाबत योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी काही नागरिकांतून करण्यात आली.
या आमसभेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के. गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, राष्ट्रीय काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, तुळस माजी जि. प.सदस्य मकरंद परब, माजी उपसभापती प्रफुल्ल उर्फ बाळू परब, युवक काँग्रेस पदाधिकारी प्रथमेश उर्फ बड्या परब,
शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब, प्रीतम सावंत, रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, पेंडुर सरपंच संतोष गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, कोचरा सरपंच योगेश तेली, केळूस सरपंच योगेश शेटये, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, आसोली सरपंच बाळा जाधव, सागरतीर्थ पदाधिकारी, प्रदीप प्रभू, सत्यवान साटेलकर, मितेश परब, स्वप्निल रावळ, उमेश नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुमन कामत, वैभव फटजी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस
संतोष राऊळ, नगरसेवक, अन्य ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस तुषार साळगावकर, पंकज शिरसाट, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, कौशिक परब, संतोष परब,
वाल्मिक कुबल, महेश वेंगुर्लेकर, संदिप नाईक, संदिप पाटील, महेश सामंत, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रसाद पाटकर, समिर कुडाळकर, अण्णा वजराटकर, गोडकर, शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर राय, विविध खात्याचे प्रमुख अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे तसेच तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पीएसआय वाय. एन. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमसभा ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सभेचे प्रास्ताविक बिडीओ वासुदेव नाईक व सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page