⚡वेंगुर्ला ता.०१-:
भाजपच्या ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन मांजरेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मठ ग्रामपंचायत सरपंच रूपाली नाईक यांच्या हस्ते मठ श्री शिवाजी चौक येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे पदाधिकारी अजित नाईक, शिवसेनेचे पदाधिकारी प्रशांत नाईक, माजी मठ ग्रा.पं. सदस्य समीर मठकर, अनिल तेंडोलकर, अवी खानोलकर, बाळू मठकर, कानू गावडे, श्री. धुरी, मिलिंद परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
