Headlines

युवा सेना तालुकाप्रमुख कॅल्ट्स फर्नांडिस याचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी, ता. ३१-: सावंतवाडी शिंदे शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख कॅल्ट्स फर्नांडिस यांचा वाढदिवस आज आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॅल्ट्स फर्नांडिस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या सर्व राजकीय आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आली.दरम्यान, चराठा येथील ग्रामस्थांच्या वतीनेही कॅल्ट्स फर्नांडिस यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत आगामी काळातही सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page