दारूम उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे प्रवीण तळेकर यांची निवड

⚡कणकवली ता.२९-:
कणकवली तालुक्यातील दारूम गावच्या उपसरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे प्रवीण तळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सात पैकी सहा सदस्य ग्रामविकास आघाडीचे निवडून आले आहेत.

दारूम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची गुरुवारी निवडणूक होती. या पदाकरिता प्रविण तळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. या ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासह सात सदस्य पदाकरिता निवडणूक झाली होती. सरपंचपदी ग्रामविकास आघाडीच्या तेजस्वी लिंगायत या निवडून आल्या आहेत. 

यावेळी बोलताना नूतन सरपंच व उपसरपंच यांनी गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन कोणतेही हेवे दावे न ठेवता गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणार असून ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू असे सांगितले.

यावेळी सदस्य अमित तळेकर, सानिका राऊत, समृध्दी तावडे, वैशाली कल्याणकर, प्रभावती चव्हाण, तलाठी रासम, निरिक्षक जाधव, पोलिस पाटिल संजय बिळसकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page