आशिये सरपंच महेश गुरव तर उपसरपंचपदी संदीप जाधव

उपसरपंच निवड प्रक्रिया झाली बिनविरोध

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील आशिये सरपंच पदाचा महेश गुरव तर उपसरपंच पदाचा संदीप जाधव यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच महेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी संदीप जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय निरीक्षक तनोज कळसुलकर तर सभेचे सचिव राकेश गोळवणकर यांनी काम पाहिले.

यावेळी कणकवली शहारा लगत हे गाव आहे.त्यामुळे गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.या पुढील काळात गावातील एकही विकासकाम शिल्लक राहणार नाही,अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच महेश गुरव यांनी केले.

या सभेला उपसरपंच संदीप दिगंबर जाधव,सदस्य संजना सचिन ठाकर,मानसी किशोर बाणे,विशाखा विलास गुरव,सुहास मधुकर गुरव ,दिपाली जयसिंग गुरव,अविराज अशोक मराठे आदी नूतन सदस्य उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच शंकर गुरव,माजी सरपंच शारदा गुरव ,भाजपा बूथ अध्यक्ष प्रविण ठाकूर ,दशरथ आजगावकर,संतोष गुरव,संजय बाणे,समीर ठाकुर,सचिन ठाकुर,रविंद्र गुरव,विलास गुरव, समिरा ठाकुर,सागर ठाकुर,निलेश कदम,ग्रामपंचायत कर्मचारी दुर्वा जाधव,प्रियंका कोरगावकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page