कणकवली पत्रकार समितीतर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धा

⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही निबंध स्पर्धा तीन गटांत होणार असून स्पर्धकांनी आपले निबंध ८ जानेवारीपर्यंत सादर करावयाचे आहेत.

तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पाचवी ते सातवी या गटासाठी कोरोनातील दिवस व दप्तराचे ओझे हे दोन विषय देण्यात आले आहेत. आठवी ते दहावीच्या गटासाठी मी पत्रकार झालो तर आणि सोशल मीडिया – शाप की वरदान हे विषय देण्यात आले आहेत. तसेच अकरावी ते पंधरावीपर्यंतच्या महाविद्यालयीन गटासाठी भारताचा अमृत महोत्सव व लोकशाही आणि माध्यमांची जबाबदारी असे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

या तीनही गटांसाठी अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना तालुका पत्रकार समितीच्यावतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. इच्छूकांनी आपले निबंध ८ जानेवारीपर्यंत अशोक करंबेळकर, कणकवली व मनिष ऑनलाईन सेंटर, पंचायत समितीजवळ, कणकवली (९४२२३८१९७७) येथे द्यावेत असे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page