भाजपच्या सौ.साक्षी चव्हाण किर्लोस सरपंचपदी विराजमान

⚡कणकवली ता.२९-: मालवण तालुक्यातील किर्लोस ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या सौ. साक्षी संदीप चव्हाण विराजमान झाल्या असून त्याच्यासमवेत भाजपचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला.
यावेळी किर्लोसचे सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड, सतीश नलावडे, माजी पोलीस पाटील प्रकाश भावे, विलास भावे, अभि लाड, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळा लाड म्हणाले, किर्लोस ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपाच्या साक्षी चव्हाण यांना विजयी करून ग्रामस्थांनी जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास विकासाच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. किर्लोस गावच्या समस्या सोडवण्यासाठी या पुढच्या काळात सरपंचांसहित सर्व सदस्य कार्यरत राहतीलच परंतु भाजपा पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बाळा लाड यांनी दिली.

You cannot copy content of this page