⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील कलमठ सरपंच पदाचा संदीप मेस्त्री तर उपसरपंच पदाचा स्वप्निल चिंदरकर यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच संदीप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी दोन उमेदवारांकडून अर्ज भरला गेला त्यामध्ये स्वप्नील चिंदरकर व अनुप वारंग या दोघांकडून अर्ज भरण्यात आला त्यानंतर मतमोजणी मध्ये स्वप्निल चिंदरकर यांना १२ मते व अनुप वारंग यांना ६ मते प्राप्त करत स्वप्निल चिंदरकर हे विजयी झाले. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिश बाजी करत ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. सभेला अध्यक्ष म्हणून संदीप मेस्त्री व निवडणूक अधिकारी म्हणून मेघनाथ पाटील तर सभेचे सचिव प्रवीण कुडतरकर यांनी काम पाहिले.
या सभेला उपसरपंच स्वप्नील चिंदरकर सदस्य दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, नितीन पवार, रविंद्र यादव, स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, प्रिती मेस्त्री, तनिष्का लोकरे, इफद शेख, हेलन कांबळे, प्रियाली आचरेकर, योगिता चव्हाण, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, नजराणा शेख आदी नूतन सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, माजी पंचायत समिती उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख विजय चिंदरकर, तेजस लोकरे आदी उपस्थित होते.
