Headlines

Global Maharashtra Breaking News

देवगड हायस्कूलमध्ये १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ..

⚡देवगड, ता.२०-: शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, प्राध्यापिका सुहासिनी कदम, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. सरस्वती पूजनानंतर दहावीतील १६ व बारावीतील ३ अशा एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू…

Read Full News

पुनर्तपासणीनंतर व्ही.एन. नाबर प्रशाळेचा निकाल उज्ज्वल; दुर्वा वारंग ९९.२० टक्क्यांसह अव्वल…

⚡बांदा ता.२०-: येथील व्ही.एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशाळेचा दहावी परीक्षेचा पुर्नतपासणी नंतरचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या प्रशाळेतील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पुर्नतपासणीसाठी निकालासाठी पाठवण्यात आला होता. हा निकाल पुन्हा एस.एस.सी बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने पाठवला आहे. पुर्नतपासणीनंतर काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. नवीन पुर्नतपासणीनंतरचा व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश…

Read Full News

सावंतवाडीत पाच दिवसीय मोफत योगशिबिराला उत्साहात प्रारंभ…

⚡बांदा ता.२०-: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषद, घे भरारी फाउंडेशन आणि फिटनेस योग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 दिवसीय मोफत योगशिबिराचा प्रारंभ आज सकाळी 6.30 वाजता जिमखाना हॉल येथे उत्साहात झाला.या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिराचे अध्यक्ष म्हणून योग शिक्षक शेखर बांदेकर उपस्थित होते. याप्रसंगी फिटनेस…

Read Full News

अजित गाडगीळ यांना महाराष्ट्र दशावतार कलारत्न गौरव पुरस्कार…

⚡सावंतवाडी ता.२०-: मळेवाड येथील युवा दशावतार नाट्यकथा लेखक जे बरीच वर्षे दशावतार नाट्य कलेचे लेखन करून आपली कला सादर करताहेत.या हरहुन्नरी लेखन कलेची आवड असलेल्या अजित गाडगीळ यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्य, योगदान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व यासाठी युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन (रजि.) यांच्या वतीने “सर्वोत्तम व्यक्तिमत्व पुरस्कार सन्मान २०२६” (ठाणे) साठी निवड करून त्यांना महाराष्ट्र दशावतार कलारत्न…

Read Full News

कणकवली नगरपंचायतमार्फत ‘एकल महिला दिवस’ साजरा होणार…

मंगळवारी सकाळी ११ वाजता नगर वाचनालय हॉल येथे कार्यक्रम.. ⚡कणकवली ता.२०-: महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे ‘एकल महिला धोरण’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याअनुषंगाने २३ जून रोजी साजरा होणारा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ यंदा ‘एकल (विधवा) महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ जन आजीविका योजना-शहरी (DJAY-S) तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या…

Read Full News

आजगाव मायनिंग स्थगितीची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच…

रूपेश राऊळ:ड्रोन सर्वेक्षणाला दिलेली मंजुरी रद्द करा.. ⚡सावंतवाडी ता. १९-:आजगाव येथील मंदिरात जाऊन “मी पालकमंत्री असेपर्यंत आजगावसह ११ गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होणार नाही” असा निर्वाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. मात्र, प्रशासनाने ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला दिलेल्या मंजुरीला स्थगिती देण्याची खरी जबाबदारी आता पालकमंत्र्यांचीच असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आधार व फार्मर आयडी शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.२०-:महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, देवगड (पडेल मंडळ) यांच्या वतीने सोमवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विजयर्दुर्ग पोलीस स्टेशनसमोरील हॉटेल विहंगम येथे मोफत आधार सेवा व फार्मर आयडी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर पंचायत समिती सदस्य रवींद्र…

Read Full News

घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी, १९ जून २०२६: पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने नुकताच तालुका स्कूल शाळा नं. १, सावंतवाडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळा नं. १ च्या समोरील ग्राउंडमधील उपलब्ध जागेत घे भरारी फाउंडेशनच्या पदाधिकारी व सभासदांनी उपयुक्त अशा विविध देशी रोपांची लागवड केली. चाफा, चिकू, जांभूळ, जाम, सुपारी, अशोक…

Read Full News

नाट्य-चित्रपट रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांचे २४ जुन रोजी मोफत व्याख्यान…

⚡सावंतवाडी ता.२०-: सुप्रसिदध लेखक, दिग्दर्शक, नाट्य-चित्रपट रंगकर्मी आणि आवाज तज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे मोफत व्याख्यान बुधवार दि.२४ जुन रोजी सायंकाळी पाच वाजता खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीत घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई ॲकेडमी, बालरंग आणि व्हिजन व्हाॅईस एन ॲक्ट यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात येत आहे. व्यक्तिमत्त्व घडवण्यात आवश्यक असते ते म्हणजे आपला…

Read Full News

आजगाव येथील नियोजित २३ रोजी होणारी मायनिंग विरोधी जनजागृती रॅली रद्द…

⚡सावंतवाडी ता.२०-: आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समिती यांनी मंगळवार २३ जून रोजीआयोजित ,केलेली जनजागृती रॅली काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. या रॅलीचा मार्ग श्री देव वेतोबा मंदिर, आजगाव येथून रॅली सुरू होऊन शिरोडा मार्गे श्री देव वेतोबा मंदिर, आरवली येथे पोहचणार होती व त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला आजगाव दशक्रोशीतील…

Read Full News

You cannot copy content of this page