Headlines

कणकवली नगरपंचायतमार्फत ‘एकल महिला दिवस’ साजरा होणार…

मंगळवारी सकाळी ११ वाजता नगर वाचनालय हॉल येथे कार्यक्रम..

⚡कणकवली ता.२०-: महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे ‘एकल महिला धोरण’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याअनुषंगाने २३ जून रोजी साजरा होणारा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ यंदा ‘एकल (विधवा) महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ जन आजीविका योजना-शहरी (DJAY-S) तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नगर वाचनालय हॉल, कणकवली येथे शासकीय योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात शहरातील एकल महिलांच्या समस्या, अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय विविध शासकीय पेन्शन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच उपजीविकेसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यावेळी एकल महिलांसाठी संवाद सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

‘एकल महिलांचा सन्मान, समाजाच्या प्रगतीचा पाया’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असून, शहरातील जास्तीत जास्त एकल महिलांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील तसेच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page