⚡सावंतवाडी ता.२०-: सुप्रसिदध लेखक, दिग्दर्शक, नाट्य-चित्रपट रंगकर्मी आणि आवाज तज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे मोफत व्याख्यान बुधवार दि.२४ जुन रोजी सायंकाळी पाच वाजता खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीत घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई ॲकेडमी, बालरंग आणि व्हिजन व्हाॅईस एन ॲक्ट यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात येत आहे. व्यक्तिमत्त्व घडवण्यात आवश्यक असते ते म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. श्रीनिवास नार्वेकर गेली सत्तावीस वर्षे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि आवाज-देहबोली यावर काम करत आहेत. गेल्या वर्षी सावंतवाडीत मुलांसाठी अभिनय कार्यशाळा घेण्यात आली. यापुढे देखील मुलांसाठी बालनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या त्यांच्या कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. विविध संस्था, महाविदयालयात त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले जाते. मुंबई विदयापीठाचा नाट्यविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम व ॲक्टिंग डिप्लोमा कोर्ससाठी निमंत्रित व्याख्याता म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. प्रत्येकाला कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने सामोरे जाणे फार आवश्यक असते. यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी ८००७३८२७८३ श्री.कौस्तुभ पेडणेकर यांना संपर्क करायचा आहे. शालेय विदयार्थ्यांनी, पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांनी केले आहे.
नाट्य-चित्रपट रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांचे २४ जुन रोजी मोफत व्याख्यान…
