Headlines

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आधार व फार्मर आयडी शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.२०-:
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, देवगड (पडेल मंडळ) यांच्या वतीने सोमवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विजयर्दुर्ग पोलीस स्टेशनसमोरील हॉटेल विहंगम येथे मोफत आधार सेवा व फार्मर आयडी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले असून नागरिकांना आधार कार्डशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करणे, आधारवरील पत्ता बदलणे, बायोमेट्रिक व छायाचित्र अद्ययावत करणे, नवीन मतदार नोंदणी, फार्मर आयडी नोंदणी तसेच पीएम किसान व इतर शासकीय योजनांबाबत आवश्यक सेवा पुरविण्यात येणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिबिराचे आयोजक रवींद्र तिर्लोटकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page