⚡बांदा ता.२०-: येथील व्ही.एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशाळेचा दहावी परीक्षेचा पुर्नतपासणी नंतरचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या प्रशाळेतील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पुर्नतपासणीसाठी निकालासाठी पाठवण्यात आला होता. हा निकाल पुन्हा एस.एस.सी बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने पाठवला आहे. पुर्नतपासणीनंतर काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. नवीन पुर्नतपासणीनंतरचा व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा प्रशाळेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
दुर्वा वारंग ९९.२० टक्के, अनुष्का तेली ९६ टक्के, सुयश गावकर ९५.४० टक्के, साक्षी गवंडी ९४.६० टक्के, वेदा सावंत ९४.२० टक्के, सान्वी राऊळ ९०.८० टक्के, तन्वी दळवी ९०.६० टक्के यांनी यश मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री मंगेश कामत चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मंगेश कामत, तसेच मुख्याध्यापक सौ. मनाली देसाई, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, शालेय समिती उपाध्यक्ष दिवाकर मावळणकर यांनी अभिनंदन केले आहे.
पुनर्तपासणीनंतर व्ही.एन. नाबर प्रशाळेचा निकाल उज्ज्वल; दुर्वा वारंग ९९.२० टक्क्यांसह अव्वल…
