Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन,:टोल संदर्भात सिंधुदुर्ग वासियांना दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी केला पूर्ण .. ⚡सिंधुदुर्ग दि.२३-:महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोल संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच-०७…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात नेपाळी कामगाराचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू…

⚡दोडामार्ग ता.२३-: दोडामार्ग तालुक्यातील मळेवाडी-घाटवाडी परिसरात एका नेपाळी कामगाराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोडामार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ओळख पटलेला मृत व्यक्ती पवनलाल राय (वय 37, मूळ रहिवासी नेपाळ) हा मळेवाडी-घाटवाडी येथे मजुरीचे काम करत होता. सोमवारी (दि….

Read Full News

बांद्यात नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप…

⚡बांदा ता.२३-: भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना व नागरिकांना मोफत खाऊ वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या…

Read Full News

आंबोलीत साखर वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीत कार्यक्रम; महिला भगिनींची मोठी उपस्थिती.. ⚡आंबोली ता.२३-:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली गावात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंबोलीच्या सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर यांच्या पुढाकाराने आंबोली ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील एकल महिला भगिनींना साखरेचे वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदार संघात शालेय विद्यार्थ्यांना 2500 रक्तचंदन रोपांचे वाटप…

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम ⚡कणकवली ता.२३-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने हरकुळ बुद्रुक मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना 2,500 रक्तचंदन रोपांचे वाटप करण्यात…

Read Full News

माऊली मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम…

रुग्णांना फळे वाटप करून नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा.. ⚡कणकवली ता.२३-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांच्या प्रकृतीची…

Read Full News

भाजप मालवण कार्यालयात योग दिन उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.२२-:भारतीय जनता पार्टीच्या मालवण कार्यालयात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली. या योग दिन कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेविका तथा नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, पूजा वेरलकर, महिमा मयेकर, अमृता फाटक, नगरसेवक…

Read Full News

आरोस पंचक्रोशी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना अजय खोत यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य…

⚡सावंतवाडी ता.२२-: आरोस विद्या विकास हायस्कूल मधील विद्यार्थ्याना ,दांडेली, खोतवाडी येथील रहिवाशी अजय खोत यांनी आपली आई स्व.प्रभावती मनोहर खोत यांच्या स्मरणार्थ आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल , आरोस या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वह्या)भेट स्वरूपात दिल्या. सामाजिक कार्यकर्ते अजय खोत यांचीकायमच शाळेला मदत होत असते.त्यांच्या दातृत्वाबद्दल संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी…

Read Full News

कबीराच्या आंबा वळणावर एसटी-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक…

स्कॉर्पिओचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली.. ⚡देवगड ता.२२-:एसटी बसची स्कॉर्पिओ गाडीला समोरून धडक बसून झालेल्या अपघातात स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.हा अपघात सोमवारी सकाळी १०.४० वा.सुमारास देवगड मोंड बापर्डे मार्गावर मोंड हॉस्पिटलनजिक मोंडपार कबीराचा आंबा येथील वळणावर झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, देवगड आगाराची वानिवडे देवगड…

Read Full News

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेची वालाव मध्ये कार्यानुभव कार्यशाळा…

⚡कुडाळ ता.२२-: डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम सुरू असून या विद्यालयातील विद्यार्थी गावात जाऊन ४ महिने कामाचा अनुभव घेतात. वालावल मध्ये माठवाडी, गावधड, चौधरीवाडी, कद्रेकरवाडी , या ठिकाणी भाजी लागवड, काजू लागवड, सुपारी लागवड असे उपक्रम घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page