Headlines

आंबोलीत साखर वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा…

सरपंच सावित्री पालेकर यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीत कार्यक्रम; महिला भगिनींची मोठी उपस्थिती..

⚡आंबोली ता.२३-:
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली गावात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंबोलीच्या सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर यांच्या पुढाकाराने आंबोली ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील एकल महिला भगिनींना साखरेचे वाटप करून पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित महिला भगिनींनी पालकमंत्री नितेश राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभावी तसेच त्यांच्या आगामी कार्यास यश मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
या कार्यक्रमास आंबोलीच्या सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर, ग्रामपंचायत माजी सदस्य श्री. काशीराम राऊत, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page