⚡बांदा ता.२३-: भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना व नागरिकांना मोफत खाऊ वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्री वाटप करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य, भाजप पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.
बांद्यात नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप…
