Headlines

Global Maharashtra Breaking News

प्रकाश वालावलकर यांना राष्ट्रीय आदर्श कृषी रत्न पुरस्कार जाहीर…

⚡बांदा ता.३०-: मडूरा-डिगवाडी येथील प्रगतिशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वालावलकर यांची ‘राष्ट्रीय आदर्श कृषी रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. पंढरपूर येथील विचार मंथन सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.प्रकाश वालावलकर गेल्या सुमारे ३६ वर्षांपासून शेती व बागायती व्यवसायात कार्यरत आहेत. कृषी…

Read Full News

सावंतवाडी बसस्थानकातील १२ तोळे सोन्याच्या चोरीचा छडा…

संशयित सराईत महिला चोरटी जालन्यातून जेरबंद; पोलिसांची संयुक्त कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.३०-: बसस्थानक परिसरात एका प्रवाशाचे तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्या महिला आरोपीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने जालना जिल्ह्यातील मंठा येथून सापळा रचून या महिलेला ताब्यात घेतले. संगीता सुभाष…

Read Full News

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातून कुडाळ शहरात विशेष स्वच्छता मोहीम…

गणेश घाट ते पंचायत समिती परिसरासह कविलकट्टे येथील पाणवठ्याची स्वच्छता:नागरिकांचा सहभाग.. ⚡कुडाळ ता.३०-: ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम कुडाळ नगरपंचायतीमार्फत २८ सप्टेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आला. या मोहिमेत मुख्य गणेश घाट ते पंचायत समिती कुडाळपर्यंतच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच कविलकट्टे येथील मुख्य ओढ्यावरील पाणवठ्याच्या परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात…

Read Full News

तायक्वांदो स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या मुशेब पटेलची विभागीय स्तरावर निवड

१९ वर्षांखालील ५१ ते ५५ किलो वजनी गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक कुडाळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या बारावीतील विद्यार्थी मुशेब पटेल…

Read Full News

कुडाळात डॉ. महेश अभ्यंकर यांचे ३ ऑक्टोबरला JEE, NEET, MHT-CET मार्गदर्शन व्याख्यान…

विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी मोफत मार्गदर्शन:नावनोंदणीचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.३०-: बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सेंट्रल स्कूल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने JEE, NEET आणि MHT-CET परीक्षांच्या तयारीसंदर्भात सुप्रसिद्ध औषधतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर यांच्या मोफत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी बॅरिस्टर नाथ पै…

Read Full News

वैभववाडी खरेदी-विक्री संघातर्फे गुणवंत शेतकऱ्यांचा गौरव…

उत्कृष्ट भात, काजू, ऊस उत्पादकांसह प्रयोगशील व पशुपालक शेतकऱ्यांचा सन्मान.. ⚡वैभववाडी ता.३०-: वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा चेअरमन प्रमोद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्हाईट चेअरमन आंबाजी हुंबे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक…

Read Full News

रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा…

सिद्धेश रावराणे:सांगुळवाडीत विश्वविक्रमी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन.. ⚡वैभववाडी ता.३०-: तालुक्यातील होतकरू गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.​शहीद विजय साळसकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी आणि…

Read Full News

नावळेत नेत्र तपासणी, एक्सरे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡वैभववाडी ता.३०-: नावळे ग्रामपंचायतच्या वतीने माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान आणि सेवा संकल्प अभियान या अंतर्गत नेत्र तपासणी शिबिर व एक्सरे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नावळे गावातील 150 हून अधिक लोकांनी याचा लाभ घेतलाया शिबिराचे उद्घाटन जि प सदस्या रिद्धी सुतार व प सं सदस्य मंगेश लोके यांच्या उपस्थिती संपन्न झाले.यावेळी…

Read Full News

वैभववाडी खरेदी-विक्री संघातर्फे सहा शेतकरी, बचत गटांचा गौरव

⚡वैभववाडी ता.३०-: वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे गौरव करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध पिकांचे उत्पादन घेऊन आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.​यंदाच्या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून लोर येथील शांताराम बाबाजी कदम,…

Read Full News

दुष्काळी परिस्थितीत वैभववाडीतील शेतांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी…

⚡वैभववाडी ता.३०-: तालुका दुष्काळी म्हणून घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील तिन्ही जि प मतदार संघ व सहा पंचायत समिती मतदार संघातील गावातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन जि प सदस्य व प स सदस्य व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी पाहणी केली.या पाणी दौऱ्याला लोरे जी प मतदार संघातील खांबाळे प स मतदारसंघाती…

Read Full News

You cannot copy content of this page