Headlines

Global Maharashtra Breaking News

ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग समन्वयक पदी बाळा गावडे यांची नियुक्ती

⚡सावंतवाडी ता.०९-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदूर्ग जिल्हा समन्वयकपदी बाळा गावडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे याबाबतची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Read More

इतिहास अभ्यासक, जेष्ठ आर एस एस कार्यकर्ते प्रकाश नारकर यांचे निधन…

⚡ओरोस ता.०९-: कसाल बाजारपेठ येथील रहिवासी, इतिहासाचे अभ्यासक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक तसेच नारकर सर म्हणून सुपरिचित असलेले जिल्ह्यातील एक चांगले व्यक्तिमत्त्व प्रकाश भाऊ नारकर (६८) यांचे शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या राहत्याघरी अल्पशा आजाराने निधन झाले.प्रकाश नारकर हा एक चालता बोलता इतिहास होता. ते न्यू इंग्लिश स्कूल, कसालचे निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक होते. त्यांनी कसाल…

Read More

युवासेना सचिव वरुण सरदेसाई ११ रोजी मालवणात

मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील ‘कॉलेज कक्ष’चे होणार उद्घाटन :मंदार ओरसकर यांची माहिती.. ⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्ष उद्घाटन केली जाणार आहेत. मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील कॉलेज कक्ष उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता…

Read More

दांडी शाळेतील तृणधान्य पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम

⚡मालवण ता.०९-: मालवण येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा दांडी या प्रशालेमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस ,ग्रामस्थ, पालक यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत सौ.निर्झरा नरेश जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, त्यांची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर द्वितीय क्रमांक- कु.तनया विठोबा वायंगणकर, तृतीय…

Read More

विरण येथे ११ रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी

⚡मालवण ता.०९-: पोईप, मसुरे, गोळवण, बागायत या विभागांतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता पोईप विभागप्रमुख प्रसाद चव्हाण यांच्या विरण येथील सलूनमध्ये साजरी करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक समाज मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Read More

ओझर विद्यामंदिरची तिलारी प्रकल्पाला क्षेत्रभेट

⚡मालवण ता.०९-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीच्या ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेच्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल व जलसुरक्षा विषयांतर्गत जलसिंचनाचा अभ्यास व निरीक्षण करण्याच्या दृष्टीने नुकतेच क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ओझर विद्यामंदिरचे विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी प्रकल्प येथे गेले होते. वाटेत क्षेत्रभेटीत सहभागी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिलारी येथील मुख्य धरण…

Read More

महिला बचतगटांसाठी एक पाऊल…

कोळंब येथे भव्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡मालवण ता.०९-: आपल्या गावातील महिला बचतगटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि मार्केटमध्ये त्यांनी बनविलेल्या पदार्थांना एक स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने कोळंब गावातील उमेद महिला बचतगटांच्या महिलांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोळंब ग्रामपंचायत आणि समर्थ हाॅल या व्यवस्थापनानेही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचतगटातील महिलांनी…

Read More

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेचे घवघवीत यश…

प्रशालेने सादर केलेल्या ‘अंधश्रद्धा’ नाटकाचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक ⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ- : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ /२४ स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या शाळेतील विद्यार्थ्यानीघवघवीत यश मिळविले आहे. त्यांनी सादर केलेल्या ‘अंधश्रद्धा’ या नाटकाचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आला.या नाट्यस्पर्धेसाठी…

Read More

शालेय विभागीय जलतरण स्पर्धेसाठी पार्थ परबची निवड

⚡वेंगुर्ला ता.०९-: क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाआतील जलतरण व डायव्हिंग या स्पर्धेत प्रि.एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता नववीतील विद्यार्थी पार्थ प्रविण परब याने यश संपादन केले.

Read More

रूग्णालयातील समस्या येत्या ३० दिवसात सोडविणार-डॉ.संदिप सावंत

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील दुराव्यवस्था व विविध समस्यांबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे ८ सप्टेंबर रोजी रुगणालयाच्या ठिकाणी आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी डॉ. संदिप सावंत हे उपजिल्हा रुग्णालयास कायमस्वरूपी अधिक्षक म्हणून दिले आहेत. डॉ.सावंत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या ३० दिवसांत केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले.

Read More
You cannot copy content of this page