⚡वेंगुर्ला ता.०९-: क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाआतील जलतरण व डायव्हिंग या स्पर्धेत प्रि.एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता नववीतील विद्यार्थी पार्थ प्रविण परब याने यश संपादन केले.
यात जलतरण स्पर्धेत २०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक, १०० मी. बटरफ्लायमध्ये प्रथम क्रमांक, ५० मी. फ्रि स्टाईलमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याची शालेय विभागीय स्तरावर होणा-या जलतरण स्पर्धसाठी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.