प्रशालेने सादर केलेल्या ‘अंधश्रद्धा’ नाटकाचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक
⚡सावंतवाडी ता.०९सहदेव राऊळ- : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ /२४ स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या शाळेतील विद्यार्थ्यानी
घवघवीत यश मिळविले आहे. त्यांनी सादर केलेल्या ‘अंधश्रद्धा’ या नाटकाचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आला.
या नाट्यस्पर्धेसाठी प्रशालेतील हर्षिता राऊळ, नेहा राऊळ, आदिती राणे, रुणाल पेडणेकर, किशोर फडके, सोहम ठाकूर, बापू जोशी, दुर्वांकुर राऊळ, आशीर्वाद रेडकर, मधुकर धुरी यांनी सहभाग घेतला होता. या सर्व नाटकासाठी प्रशालेतील संगणक निदेशक श्री. रितेश सत्यवान राऊळ यांनी खूप मेहनत घेतली. नाटकाचे लेखन, नेपथ्य तसेच दिग्दर्शक आदी सर्व कामे तसेच विद्यार्थ्यांचे नाटक बसविण्याची सर्व मेहनत श्री राऊळ यांनी घेतली. यात प्रशालेतील ग्रंथपाल श्री सतीश राऊळ यांचेही मार्गदर्शन लाभले. नाट्य स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय संस्थेचे अध्यक्ष श्री शिवराम मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री मनोहर राऊळ, कायदेविषयक सल्लागर अँड श्री. विरेश राऊळ, शिक्षण सल्लागार श्री. वैजनाथ देवण, शाळेचे मुख्याध्यापक श्री मारुती फाले, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष अभिनंदन केले