मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील ‘कॉलेज कक्ष’चे होणार उद्घाटन :मंदार ओरसकर यांची माहिती..
⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्ष उद्घाटन केली जाणार आहेत. मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील कॉलेज कक्ष उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता होणार असून यावेळी सरदेसाई हे युवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती युवासेना मालवण तालुका समन्वयक तथा मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर यांनी दिली आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, युवासेना विस्तारक अमित पेडणेकर, युवतीसेना विस्तारक रुची राऊत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी मालवण शहर व तालुक्यातील युवासेना पदाधिकारी यांनी मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मंदार ओरसकर यांनी केले आहे.