⚡ओरोस ता.०९-: कसाल बाजारपेठ येथील रहिवासी, इतिहासाचे अभ्यासक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक तसेच नारकर सर म्हणून सुपरिचित असलेले जिल्ह्यातील एक चांगले व्यक्तिमत्त्व प्रकाश भाऊ नारकर (६८) यांचे शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या राहत्याघरी अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रकाश नारकर हा एक चालता बोलता इतिहास होता. ते न्यू इंग्लिश स्कूल, कसालचे निवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक होते. त्यांनी कसाल बाजारपेठेतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कार्याध्यक्ष, कोंकण इतिहास परिषदेचे जिल्हाध्यक्ष, इतिहास संकलन समितीचे जिल्हा संयोजक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा माजी प्रचार विभाग प्रमुख, नारुर येथील बालभैरव मंदिरचे निर्माते, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग, अखिल भारतीय गिर्यारोहक संघटना जिल्हाध्यक्ष, शारदा ग्रंथालय कसालचे संस्थापक अध्यक्ष अशा अनेक संस्थांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले. त्यामुळे जाण्याने कसाल दशक्रोशिसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पूर्ण कसालं बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नारकर सर म्हणून ते सुपरिचित होते.
त्यांच्यावर कसाल येथील स्मशान भूमीत शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रा. स्व.संघाचे प्रांत सह संघचालक अर्जुन तथा बाबा चांदेकर, जिल्हा संघचालक रविकांत मराठे, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उद्धवगट जिल्हा प्रमुख संदेश पारकर, वैष्यसमाज जिल्हाध्यक्ष ऍड अंधारी, नारुर श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट तसेच कुडाळ तालुका खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. कसाल बाजार पेठेतील नारकर हार्डवेअरचे ओमकार नारकर यांचे ते वडील तर नारकर मेडिकलचे राजू व रंजू नारकर यांचे ते काका होत.
इतिहास अभ्यासक, जेष्ठ आर एस एस कार्यकर्ते प्रकाश नारकर यांचे निधन…
