⚡मालवण ता.०९-: मालवण येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा दांडी या प्रशालेमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस ,ग्रामस्थ, पालक यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत सौ.निर्झरा नरेश जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, त्यांची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर द्वितीय क्रमांक- कु.तनया विठोबा वायंगणकर, तृतीय क्रमांक-कु.उर्मिला साबाजी चव्हाण यांनी मिळविला.
या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम- सौ.केतकी जगदिश कोयंडे, उत्तेजनार्थ द्वितीय- सौ.वैशाली हेमंत चिंदरकर, प्रोत्साहनार्थ बक्षिस- सौ.सुषमा सुभाष जोशी, सौ.प्रणिता उदय रेवंडकर, सौ.यशश्री यशवंत चांदेरकर, सौ.अन्वी आनंद धुरी, सौ.आरती अर्जून धुरी, सौ.प्रिया यशवंत धुरी, सौ.यशवंती यशवंत लोणे, सौ.प्रतिक्षा पंकज धुरी, सौ.रिया राजेश वराडकर, सौ,प्रियांका प्रविण कोळगे, सौ.तनुश्री तेजस तारी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले. सर्व बक्षिसे दांडी शाळा शिक्षकवृंद यांनी पुरस्कृत केली होती.
स्पर्धेचे परीक्षण सौ.अंजना दत्तप्रसाद सामंत व सौ.राधिका शशिकांत मोरजकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक सौ.विशाखा चव्हाण,पदविधर राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत, सहाय्यक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर व सौ.अमृता राणे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिवराज सावंत यांनी केले.