Headlines

Global Maharashtra Breaking News

माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांना मातृशोक…

⚡सावंतवाडी ता.०२- : सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी जयश्री जयकांत पेडणेकर ( ८६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस बेलापूर नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी १ वाजता सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर महेश सारंग यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर भाजप सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीबाबत भाजपच्या कार्यकर्यांनी सारंग यांचे अभिनंदन केले.

Read Full News

केसरकरांच्या जागी मी असतो तर सगळ्यांना सुतासारखे सरळ केले असते …

मंत्री उदय सामंत : नाक्यावर पक्षाच्या गप्पा नको : तर जनतेमध्ये जाऊन काम करा.. ⚡सावंतवाडी ता.०२-: दीपक केसरकर यांचा चांगला स्वभाव आहे त्याचाच सगळीकडे गैरफायदा घेतला जातं असून तुमच्या जागी मी असतो तर सगळ्यांना सुतासारखे सरळ केले असते अशी समज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिली. दरम्यान ना केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेमधून…

Read Full News

जी लोक सहानुभूतीचे राजकारण करतात त्यांनी अडीच वर्षात काय काम केले…?

मंत्री दीपक केसरकर :तुमचा पक्ष आमच्यामुळे तुटला नाही त्याचा जाब संजय राऊत यांना विचारा… ⚡सावंतवाडी ता.०२-: प्रत्येक बूथ वाईज दौरे लावा गाड्या घ्या फिरा या पक्षाला बाळासाहेब यांच नाव आहे धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह आहे.सावंतवाडी जी लोक आता सहानुभूतीचे राजकारण करीत आहेत त्यांनी अडीच वर्षात काय काम केले हे पाहावे असा टोला राज्याचे शालेय…

Read Full News

मोरगाव येथील बंद फार्म हाऊसमध्ये चोरी…

पाच जणांना रंगेहाथ पकडले ;चोरटे चंदगड, बेळगावमधील.. ⚡दोडामार्ग ता.०२-: मोरगाव येथील बंद फार्म हाऊसमध्ये असलेले साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संबंधित संशयित सोमवारी (ता.02) रात्री 2 च्या दरम्यान ग्राबीन पानशील फर्नांडिस (रा. महाबळेश्वर) यांच्या मोरगाव, तालुका दोडामार्ग येथे बंद अवस्थेत असलेल्या फार्महाउस मध्ये प्रवेश…

Read Full News

वरचीवाडी येथील गवळदेव मंदिरा नजीकच्या वटवृक्षाला लागली आग…

⚡मालवण ता.०२-: घुमडे वरचीवाडी येथील गवळदेव मंदिरा नजीकच्या एका जुनाट वटवृक्षाला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग लागल्याची माहिती भाजपा नेते दत्ता सामंत यांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या मार्फत मालवण नगरपालिकेला कळविल्यानंतर मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने वडाला लागलेली ही आग विझविली. ही आग विझविण्यासाठी प्रशांत बिरमोळे , दिलीप बिरमोळे , अग्निशमन…

Read Full News

विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप राज्याच्या विद्यमान सरकारने केले…

हरी खोबरेकर:न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सर्व कामांची स्थगिती उठवली;त्यामुळे याचे श्रेय आम्ही घेणारच… ⚡मालवण ता.०२-: कुडाळ मालवण मतदार संघाच्या कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप राज्याच्या विद्यमान सरकारने केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सर्व कामांची स्थगिती उठवून मंजूर विकासनिधी सर्व कामांना परत केला. त्यामुळे याचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचेच आहे आणि ते आम्ही…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी जनरल सेक्रेटरी पदी शुभम सकपाळ याची निवड…

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील शुभम सकपाळ याची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची ललिता कांदळगावकर हिची निवड करण्यात आली. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विध्यार्थी परिषद २०२३-२४ ची निवड प्रक्रिया आज महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली….

Read Full News

आचरा ग्रामपंचायतच्या शवपेटीचे सरपंचांच्या हस्ते लोकार्पण…

⚡मालवण ता.०२-: आचरा गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते. आचरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही शवपेटीची सुविधा उपलब्ध नव्हती. आचरा गावासाठी शवपेटीची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. शवपेटीची गरज ओळखून आचरा ग्रामपंचायत मार्फत पंधरा वित्त आयोगातून आचरा गावासाठी शवपेटी खरेदी करत तीचे लोकार्पण आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते…

Read Full News

आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने आचरा खाडीपत्रात कांदळवन रोपांची लागवड

⚡मालवण ता.०२-: आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने सागर संवाद यात्रे अंतर्गत आचरा खाडी पात्रात कांदळवन रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी कुडाळचे वनक्षेत्रपाल सं. श्री. कुंभार, कडावलचे वनक्षेत्रपाल अमित कटके, मालवण वनपाल श्रीकृष्ण परिठ, आम आदमी पक्षाच्या लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड….

Read Full News

You cannot copy content of this page