जी लोक सहानुभूतीचे राजकारण करतात त्यांनी अडीच वर्षात काय काम केले…?

मंत्री दीपक केसरकर :तुमचा पक्ष आमच्यामुळे तुटला नाही त्याचा जाब संजय राऊत यांना विचारा…

⚡सावंतवाडी ता.०२-: प्रत्येक बूथ वाईज दौरे लावा गाड्या घ्या फिरा या पक्षाला बाळासाहेब यांच नाव आहे धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह आहे.सावंतवाडी जी लोक आता सहानुभूतीचे राजकारण करीत आहेत त्यांनी अडीच वर्षात काय काम केले हे पाहावे असा टोला राज्याचे शालेय शिक्षण दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला.दरम्यान

पांणबुडी प्रकल्प दुसरीकडे जाणार म्हणून ओरड मारली जातेय परंतु या परिस्थितीला हेच लोक कारणीभूत आहेत. केरळ वं गुजरात राज्याने अडीच वर्षांपूर्वी पाणबुडी बुक केली तेव्हा पर्यटन मंत्री कोण होते त्यांनी अगोदर का बुक केली नाही यांचे उत्तर अगोदर द्यावे असा टोला देखील केसरकर यांनी ठाकरे सेनेला लगावला.

दरम्यान चांदा ते बांदा योजनेचे मंजूर एका वेळीच साडे चारशे कोटी रुपये परत गेले ही योजना कोणी बंद केली. कोकणाने तुम्हाला हात दिला तुम्ही कोकणच नुकसान केले हे लोकांना पटवून सांगा. जिल्ह्याच्या बजेटसाठी 260 कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती मात्र तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि आमचे पैसे काढून घेतले याबाबत आमची मागणी होती परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही पक्षातून बाहेर पडलो. तुमचा पक्ष आमच्यामुळे तुटला नाही त्याचा जाब संजय राऊत यांना विचारा आम्ही युतीत मिठाचा खडा टाकला नाही असे केसरकर म्हणाले.
मला मंत्री पदावरून काढल्याच दुःख नाही. मी निवडणुकीला उभा देखील राहणार नव्हतो या जिल्ह्याचा स्वाभिमान मोठा आहे.

You cannot copy content of this page