केसरकरांच्या जागी मी असतो तर सगळ्यांना सुतासारखे सरळ केले असते …

मंत्री उदय सामंत : नाक्यावर पक्षाच्या गप्पा नको : तर जनतेमध्ये जाऊन काम करा..

⚡सावंतवाडी ता.०२-: दीपक केसरकर यांचा चांगला स्वभाव आहे त्याचाच सगळीकडे गैरफायदा घेतला जातं असून तुमच्या जागी मी असतो तर सगळ्यांना सुतासारखे सरळ केले असते अशी समज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिली.

दरम्यान ना केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेमधून करोडो रुपये निधी दिला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकचा हा निधी होता परंतु ती योजना बंद करण्यात आली अशा प्रकारे कोकणावर अन्याय करण्याचे काम मागील सरकारने केले हे येथील जनतेला समजून सांगा. राजापूर येथे होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्याला माणसं कमी आली तर सीट सोडावी अशी प्रवृत्ती वाढीस लागेल त्यामुळे या सभेचे रूपांतर मेळाव्यात झाले पाहिजे. मुख्यमंत्री यांना वाटले पाहिजे ही उद्याच्या लोकसभेच्या विजयाची नांदी आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला तुमची ताकद वापरावी लागेल. नाक्यावर पक्षाच्या गप्पा नको तो पक्षासाठी दिलेला वेळ नाही तर जनतेमध्ये जाऊन काम करा योगदान दया ते महत्वाचं आहे.असे ही सामंत म्हणाले दरम्यान

महाराष्ट्रातील 48 सर्वच्यां सर्व लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत त्याकरिता युद्धपातळीवर ही सभा यशस्वी होण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन ना उदय सामंत यांनी केले.

You cannot copy content of this page