मोरगाव येथील बंद फार्म हाऊसमध्ये चोरी…

पाच जणांना रंगेहाथ पकडले ;चोरटे चंदगड, बेळगावमधील..

⚡दोडामार्ग ता.०२-: मोरगाव येथील बंद फार्म हाऊसमध्ये असलेले साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित संशयित सोमवारी (ता.02) रात्री 2 च्या दरम्यान ग्राबीन पानशील फर्नांडिस (रा. महाबळेश्वर) यांच्या मोरगाव, तालुका दोडामार्ग येथे बंद अवस्थेत असलेल्या फार्महाउस मध्ये प्रवेश करून त्यामध्ये असलेले एसीचा कॉम्प्रेसर व रेडिएटर चोरी करण्याच्या उद्देशाने बाहेर फेकून देऊन व आतील लोखंडी सामान तसेच इलेक्ट्रिक फॅन चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मिळून आले. याप्रकरणी हुसेन दुर्गाप्पा लाडलक्ष्मी (वय- 31,राहणार -अडकूर, तालुका- चंदगड ),सुरेश बाबू तुम्मानवर,( वय 37 राहणार दड्डी, तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव) रामू दुर्गाप्पा लाडलक्ष्मीकार,( वय-42, राहणार शिरगाव तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर) सुरेश सत्तपा सिंगनुर, (वय 28, न्यू कांडरवल्ली तालुका जिल्हा बेळगाव ), श्याम बाबू तुम्मानवर,( वय 19 राहणार-दड्डी, तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.मधुकर अर्जुन पवार, (वय-65, रा. मोरगाव पवारवाडी ) यांनी चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली.सहायक पोलिस निरीक्षक योगेश ठाकूर पुढील तपास करत आहे.

You cannot copy content of this page