वरचीवाडी येथील गवळदेव मंदिरा नजीकच्या वटवृक्षाला लागली आग…

⚡मालवण ता.०२-: घुमडे वरचीवाडी येथील गवळदेव मंदिरा नजीकच्या एका जुनाट वटवृक्षाला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली.

ही आग लागल्याची माहिती भाजपा नेते दत्ता सामंत यांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या मार्फत मालवण नगरपालिकेला कळविल्यानंतर मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने वडाला लागलेली ही आग विझविली. ही आग विझविण्यासाठी प्रशांत बिरमोळे , दिलीप बिरमोळे , अग्निशमन बंबाचे वाहन चालक वसंत शिर्सेकर, फायरमन वैभव वळंजू, कर्मचारी भूषण जाधव व ग्रामस्थांनी शर्थिचे प्रयत्न केले.ही आग वेळीच विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

You cannot copy content of this page