Headlines

विशाल परब यांच्या माध्यमातून माजगाव प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप..

⚡सावंतवाडी, ता. ३०-: माजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना विशाल परब यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी माजी सरपंच दिनेश सावंत, अजय सावंत, बांदेकर, मेरी फर्नांडिस, सुर्वे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल विशाल परब यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page