स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी जनरल सेक्रेटरी पदी शुभम सकपाळ याची निवड…

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी (जनरल सेक्रेटरी) पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील शुभम सकपाळ याची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची ललिता कांदळगावकर हिची निवड करण्यात आली.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विध्यार्थी परिषद २०२३-२४ ची निवड प्रक्रिया आज महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यामध्ये प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, प्रा. के. के. राबते, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगले, एस. पी. खोबरे, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. डॉ. उज्वला सामंत आदी सहभागी झाले होते. या विध्यार्थी परिषदेत शुभम सकपाळ (सांस्कृतिक विभाग), गितेश वळंजू (एनएसएस विभाग), विनायक मानवर (एनसीसी विभाग), प्रणिता गोसावी (प्राचार्य निर्देशित), हर्षाली कांदळकर (प्राचार्य निर्देशित), ज्योती जाधव (प्रथम वर्ष कला), अमोल घाडी (प्रथम वर्ष वाणिज्य), मेघल डिसोजा (प्रथम वर्ष विज्ञान), चैताली कुणकवळेकर (द्वितीय वर्ष कला), निकिता आडकर (द्वितीय वर्ष विज्ञान), प्रणाली बांदेकर (तृतीय वर्ष कला), गायत्री आरोलकर (तृतीय वर्ष वाणिज्य), अभिषेक एस. एस. (तृतीय वर्ष विज्ञान) यांची निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थी जनरल सेक्रेटरी पदी निवड झालेल्या शुभम सकपाळ यांचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर व प्राध्यापक वर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी ललित चव्हाण, पंकज कवटकर, ओंकार यादव, चिन्मय कांबळी, रमाकांत फाटक, राहुल जाधव, तेजस कातवणकर, किरण करवडकर कुणाल मालवणकर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page